जलालाबाद येथे युवकाची हत्या

By Admin | Updated: March 26, 2016 02:30 IST2016-03-26T02:30:35+5:302016-03-26T02:30:35+5:30

धूलिवंदनास गालबोट; बाश्रीटाकळी तालुक्यातील घटना.

Youth murder in Jalalabad | जलालाबाद येथे युवकाची हत्या

जलालाबाद येथे युवकाची हत्या

बाश्रीटाकळी/सायखेड (जि. अकोला): बाश्रीटाकळी हद्दीत येत असलेल्या जलालाबाद (गोटखेड) येथे धूलिवंदनास गालबोट लागले. दारू पाजण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघा बापलेकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गावातीलच एका गुराख्यास ठार केल्याची घटना गुरुवार, २४ मार्च रोजी घडली. बाश्रीटाकळी पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
बाश्रीटाकळी तालुक्यातील जलालाबाद (गोटखेड) येथील संतोष रामभाऊ वाघमारे (३५) यांचा गुरुवारी रंगपंचमीच्या दिवशी आरोपी त्र्यंबक विष्णू पवार व चंद्रकांत त्र्यंबक पवार यांच्याशी वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. गावापासून १00 मीटर अंतरावर बापलेकांनी संतोष वाघमारेला लाथाबुक्क्यांनी मारून जखमी केले. जखमी अवस्थेत संतोष वाघमारे यांना आधी कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बाश्रीटाकळीचे ठाणेदार राजेंद्र जाधव, धाबा पोलीस चौकीचे राजाभाऊ बचे, रामेकर, चव्हाण, भटकर, ठाकूर आदी पोलीस कर्मचार्‍यांनी शोध मोहीम राबवून सायंकाळी त्र्यंबक पवार (६0) व त्याचा मुलगा चंद्रकांत पवार या दोघांना अटक केली.
दरम्यान, शुक्रवार, २५ मार्च रोजी मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार काळे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. विष्णू मोतीराम वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३0२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

Web Title: Youth murder in Jalalabad