कारच्या अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 06:15 PM2020-10-12T18:15:01+5:302020-10-12T18:15:16+5:30

मयुर देशमूख हे कारमधून बाहेर फेकल्या गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

Youth killed in a car accident at Akola | कारच्या अपघातात युवक ठार

कारच्या अपघातात युवक ठार

Next

अकोला : खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौरक्षण रोडवरील चार बंगल्याच्या बाजुलाच कारच्या  अपघातात एक युवक ठार झाल्याची घटना रविवारी रात्री उशीरा घडली. या अपघातात कारमधील दोघे जन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गौरक्षण रोडवरील मलकापूर येथील रहिवासी मयुर जयप्रकाश देशमुख व त्यांचे दोन मीत्र भरधाव जात असतांना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने चार बंगला परिसरात भिषन अपघात झाला. या अपघातात मयुर देशमूख हे कारमधून बाहेर फेकल्या गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांचे मीत्र आंबेकर व तीसरा मीत्र सावदेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या ठिकाणी हा दुसरा भिषन अपघात असल्याची माहिती असून यापुर्वी एका युवकाचा दुचाकीवर अपघात झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

Web Title: Youth killed in a car accident at Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.