ट्रकवर मोटारसायकल आदळल्याने युवक ठार
By Admin | Updated: November 8, 2014 00:12 IST2014-11-08T00:12:17+5:302014-11-08T00:12:17+5:30
अकोला-पातूर मार्गावरील हिंगणा फाट्याजवळ अपघात.

ट्रकवर मोटारसायकल आदळल्याने युवक ठार
अकोला : भरधाव मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६:३0 वाजताच्या सुमारास अकोला-पातूर मार्गावरील हिंगणा फाट्याजवळील नवीन बायपासवर घडली. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनीसार, म्हैसपूर येथे राहणारे नितीन बबन इंगळे(२५) व त्याचा सहकारी प्रफुल्ल कांबळे(१७) हे कळंबेश्वर येथील प्लास्टिक कारखान्यात काम करतात. शुक्रवारी दोघेही त्यांचे काम आटोपून एमएच ३0 एसी ८२९७ क्रमांकाच्या मोटारसायकलने म्हैसपूरला निघाले होते. यादरम्यान नितीन इंगळे याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक जोरदार आदळली. संपूर्ण मोटारसायकल ट्रकच्या मागील बाजूने पूर्णपणे ट्रकच्या खाली गेली आणि दोघांपैकी एकाची टोपी फालक्याला अडकली, यावरून दुचाकीचा वेग आणि अपघाताच्या भीषणतेची कल्पना यावी. यात नितीनचा जागीच मृत्यू झाला, तर प्रफुल्ल कांबळे हा गंभीर जखमी झाला. प्रफुल्लला पोलिसांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी क्षतिग्रस्त दोन्ही वाहने जप्त केली.