भरधाव ऑटोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 20:00 IST2021-05-08T20:00:43+5:302021-05-08T20:00:52+5:30

Akola Accident News : एका दुचाकीस्वार युवकास भरधाव ऑटोने जबर धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

Youth killed in an accident at Akola | भरधाव ऑटोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव ऑटोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अकोला : तहसील कार्यालयाजवळून जात असलेल्या एका दुचाकीस्वार युवकास भरधाव ऑटोने जबर धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान सायंकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

मोहता मिल चाळ परिसरातील मरघट येथील रहिवासी मोहम्मद फैजान शेख असिफ वय १८ वर्षे हा युवक दुचाकीने तहसील कार्यालयाजवळून जात असताना समोरून आलेल्या भरधाव ऑटोने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, शनिवारी सायंकाळच्या सुमारास युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

 

Web Title: Youth killed in an accident at Akola