नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने युवक जखमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:21 IST2021-01-16T04:21:23+5:302021-01-16T04:21:23+5:30
नायलॉन मांजामुळे उद्भवणारे संभाव्य धोके लक्षात घेता, गत आठवडाभरापासून पोलीस विभागामार्फत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. संक्रांतीच्या ...

नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने युवक जखमी!
नायलॉन मांजामुळे उद्भवणारे संभाव्य धोके लक्षात घेता, गत आठवडाभरापासून पोलीस विभागामार्फत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी डाबकी रोड परिसरात मोठी कारवाई करत जवळपास २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला, मात्र त्यानंतरही बाजारपेठेत नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्याचा वापर गुरुवारी पतंगोत्सवात झाल्याने काही जणांना दुखापत झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. अशीच घटना गुरुवारी शहरातील रचना कॉलनी परिसरात घडली. न्यू खेतान नगर येथील २० वर्षीय शांतनु ओमप्रकाश काशीद हा युवक गुरुवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास नेहरू पार्ककडे जात असताना रचना कॉलनी परिसरात त्याचा गळा नायलॉन मांजाने कापला गेला. या घटनेत युवक जखमी झाला असून, मोठी दुर्घटना टळली.