धुलीवंदनच्या दिवशीच युवा शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:21 IST2019-03-22T18:21:35+5:302019-03-22T18:21:40+5:30
अंदुरा (अकोला ) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून अंदुरा येथील युवा शेतकऱ्याने धुलीवंदनच्या दिवशी आत्महत्या केली.

धुलीवंदनच्या दिवशीच युवा शेतकऱ्याची आत्महत्या
अंदुरा (अकोला ) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून अंदुरा येथील युवा शेतकऱ्याने धुलीवंदनच्या दिवशी आत्महत्या केली. अतुल नारायण भगत (३५) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
स्थानिक अंदुरा येथील शेतकरी अतुल नारायण भगत याने शेती व इतर कामासाठी बँकेकडून व खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्यांना गेल्या काही वर्षांपासून शेतीत अपेक्षीत उत्पन्न होत नव्हते. यावर्षी लागवडीसाठी लागलेला खर्चही निघत नसल्याने हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत अतुल भगत याने २१ मार्च रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिस स्टेशन चे ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राम आंबेकर, राम नेमाडे यांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील ज्ञानेश्वर रोहणकर व कोतवाल राजु डाबेराव हे उपस्थित होते.अतुल हा घरातील कर्ता पुरुष होता.कर्ता पुरुष गेल्याने भगत कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ पुतणे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.(वार्ताहर)