डोहात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 11:35 IST2020-09-21T11:35:34+5:302020-09-21T11:35:43+5:30

डोहात आंघोळकरिता गेलेला आसेगाव बाजार येथील राम अरुण झापर्डे (२२) हा युवक बुडाला.

Youth drowns in deep water of river |  डोहात बुडून युवकाचा मृत्यू

 डोहात बुडून युवकाचा मृत्यू

अकोट : सातपुडा जंगलातील अकोट-खटकाली मार्गावर एका डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २० सप्टेंबर रोजी घडली. यावेळी डोहातील पाण्यात युवकाचा शोध घेत युवकाचा मृतदेह ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी काढला.
सातपुड्यात जोरदार पाऊस असल्यामुळे नदी-नाले वाहत आहे. निसर्गरम्य वातावरणात अकोट तालुक्यातील काही युवक पर्यटनाकरिता गर्दी करीत आहेत. यावेळी खटकाली मार्गावरील डोहात आंघोळकरिता गेलेला आसेगाव बाजार येथील राम अरुण झापर्डे (२२) हा युवक बुडाला. युवकाचा शोध घेण्यासाठी काही जण पाण्यात उतरले. डोहात पाणी जास्त असल्याने युवकाचा मृतदेह पाण्यात मिळत नव्हता. याबाबत अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यांना माहिती मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळ चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत असतानाही ठाणेदार ज्ञानोबा फड व अकोट तहसीलदार हरीश गुरव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी स्वत: डोहात उडी मारून पाण्यात एक तास शोध घेतला. अखेर सर्वांच्या प्रयत्नाने युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title: Youth drowns in deep water of river