युवक काँग्रेसने केली प्रतीकात्मक पेट्राेल पंपांची ताेडफाेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST2021-07-14T04:21:50+5:302021-07-14T04:21:50+5:30

अकाेला : इंधन दरवाढीच्या विराेधात युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या धाेरणांचा निषेध सुरू केला आहे. याच आंदाेलनाच्या साखळीत ...

Youth Congress demolishes symbolic petrol pumps | युवक काँग्रेसने केली प्रतीकात्मक पेट्राेल पंपांची ताेडफाेड

युवक काँग्रेसने केली प्रतीकात्मक पेट्राेल पंपांची ताेडफाेड

अकाेला : इंधन दरवाढीच्या विराेधात युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या धाेरणांचा निषेध सुरू केला आहे. याच आंदाेलनाच्या साखळीत अकाेल्यात साेमवारी प्रतीकात्मक पेट्राेल पंप तयार करून त्याची ताेडफाेड करण्यात आली. काँग्रेस नेते अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव सागर कावरे पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक सिव्हिल लाईन चौक येथे हुबेहूब पेट्रोल पंपाची प्रतिकृति तयार करण्यात आली. पेट्रोल-डिझेल आता जनसामान्यांची हातची गोष्ट राहिलेली नाही म्हणून पेट्रोल पंप मशीनची ताेडफाेड करण्यात आली. या आंदोलनात महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी,साजिद खान पठाण,प्रकाश तायडे,मदन भरगड,राजेश भारती,डॉ.सुभाष कोरपे,प्रशांत वानखडे,सौ. पुष्पा देशमुख, महेश गणगणे,कपिल रावदेव,अंशुमन देशमुख,पराग कांबळे,आकाश कवडे,मो.इरफान,रवी शिंदे, मोंटी भाई, महेंद्र गवई,दिनेश लोहोकार,गणेश कळसकर,मो.यूसुफ,सुरेश ढाकुलकर,प्रशांत भटकर,राजेश मते,अंकुश तायडे,राहुल सारवान,अंकुश भेंडेकर,कार्तिक पोदाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी पंकज देशमुख,दिनेश लोहोकार,अंकुश भेंडेकर,कार्तिक पोदाडे,सुजय ढोरे,भूषण चतरकर,अभय ताले,तुषार गावंडे,सागर ढोरे आदींनी प्रयत्न केले.

फाेटाे

Web Title: Youth Congress demolishes symbolic petrol pumps