तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या युवकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 17:20 IST2021-01-21T17:20:39+5:302021-01-21T17:20:49+5:30
Murtijapur News एक युवक तलवार घेऊन धुमाकूळ घालीत असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली

तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या युवकास अटक
मूर्तिजापूर : येथील नवीन घरकुल परिसरात हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या युवकास २१ जानेवारी रोजी अटक करुन त्याच्याकडून तलवार जप्त केली.
नवीन घरकुल परिसरात एक युवक तलवार घेऊन धुमाकूळ घालीत असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या आकाश रामदास अहेरवार (२७ राहणार लक्ष्मी नगर हातगाव हल्ली मुक्काम नवीन घरकुल मूर्तिजापूर) याला घेराव घालून त्याच्या कडून शिताफीने तलवार हस्तगत करुन अटक केली. कलम ४,२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला, ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दिपक इंगळे, नायक पोलीस शिपाई संजय वाघ, पोलीस शिपाई आकाश वाघमारे, सर्वेश कांबे यांनी केली.