विहिरीत पोहताना तरूण बुडाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 19:41 IST2017-06-12T19:41:58+5:302017-06-12T19:41:58+5:30
वरूर जऊळका (जि.अकोला): येथील आकाश अजाबराव लाखे (१६) हा युवक १२ जून रोजी दुपारी वरुर येथील सार्वजनिक विहिरीत पोहताना बुडाला.

विहिरीत पोहताना तरूण बुडाला!
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूर जऊळका (जि.अकोला): येथील आकाश अजाबराव लाखे (१६) हा युवक १२ जून रोजी दुपारी वरुर येथील सार्वजनिक विहिरीत पोहताना बुडाला असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, शाखा मुंडगाव आणि अकोट येथील युवक गावातील नागरिकांच्या सहकार्याने बुडालेल्या युवकाचा शोध घेत आहेत.
सदर विहीर मोठी असून तिच्यात सुमारे ४० ते ५० फुट खोल पाणी आहे. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात पथकाचे संजय शेळके, निखिल पाठक, प्रवीण रोठे, पंकज सुरपाटने, विकी बुलेबुले, प्रवीण सरकटे, श्याम वानखडे हे शोध मोहीम राबवित आहेत. घटनास्थळी अकोटचे नायब तहसीलदार गुरव , दहीहांडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार वनारे , पी.एस.आय. डोनकुलवार , बिट जमदार दयाराम राठोड, मंडळ अधिकारी सादीक देशमुख, तलाठी मेघा पाटील आदी उपस्थित आहेत.