बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेला तरुण पूर्णा नदीत वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:31 IST2019-08-30T12:29:46+5:302019-08-30T12:31:06+5:30

मंगेश गावंडे (२४)असे या तरुणाचे नाव असून, त्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

The young man who went to bath the bulls was drowned into the river Purna | बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेला तरुण पूर्णा नदीत वाहून गेला

बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेला तरुण पूर्णा नदीत वाहून गेला

ठळक मुद्देमंगेश गावंडे हा बैलांना आंघोळ घालण्यासाठी पूर्णा नदीवर गेला होता. सद्या पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. मंगेश गावंडे गटांगळ्या खाऊ लागला व प्रवाहासोबत वाहून गेला.

नया अंदुरा (अकोला): पोळा सनानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी त्यांना पूर्णा नदीत घेऊन गेलेला तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याची घटना बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे शुक्रवारी सकाळी घडली. मंगेश गावंडे (२४)असे या तरुणाचे नाव असून, त्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
नया अंदुरा येथील मंगेश गावंडे हा तरुण शुक्रवारी सकाळी बैलांना आंघोळ घालण्यासाठी पूर्णा नदीवर गेला होता. सद्या पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने मंगेश गावंडे गटांगळ्या खाऊ लागला व प्रवाहासोबत वाहून गेला. मंगेश नदीत वाहून गेल्याची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी नदीकाठावर धाव घेऊन व त्याचा शोध सुरू केला. यावेळी तलाठी सतीश कराड व कोतवाल राजु डांबेराव यांनी घटनास्थळावर धाव घेऊन शोध मोहिमेसाठी सहकार्य केले. नया अंदुरा व नया अंदुरा येथील ग्रामस्थ नदीपात्रात उतरून मंगेश चा शोध घेत असून शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.

 

Web Title: The young man who went to bath the bulls was drowned into the river Purna