शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

बसमध्ये विवाहितेची छेड काढणाऱ्या युवकाला अकोला बसस्थानकावर बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 5:25 PM

अकोला: एसटी बसमध्ये एका विवाहितेच्या अंगाला स्पर्श करून तिची छेड काढणाऱ्या युवकाला विवाहितेसह काही नागरिकांनी चांगलेच चोपून काढल्याची घटना शुक्रवारी दुपारी नवीन बसस्थानकाजवळ घडली.

ठळक मुद्देबसमधून उतरल्यावर महिलेने जाब विचारत युवकाला चांगलाच चोप दिला.शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी युवकाला पकडून सिव्हील लाईन पोलिसांच्या ताब्यात दिले. 

अकोला: एसटी बसमध्ये एका विवाहितेच्या अंगाला स्पर्श करून तिची छेड काढणाऱ्या युवकाला विवाहितेसह काही नागरिकांनी चांगलेच चोपून काढल्याची घटना शुक्रवारी दुपारी नवीन बसस्थानकाजवळ घडली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी युवकाला पकडून सिव्हील लाईन पोलिसांच्या ताब्यात दिले. एसटी बसमध्ये बसलेल्या एका विवाहितेच्या अंगाला स्पर्श करून तिची छेड काढणारा संजय देवराव ताम्बे(३0 रा. वडगाव वाटोदा ता. मुर्तिजापूर) याला विवाहितेने हटकले. तेव्हा संजय ताम्बे हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. महिलेने त्याचा पाठलाग करून त्याला बसस्थानकाजवळील पत्रकार कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावरील एका हॉटेलजवळ पकडले. त्याला चोप देण्यास सुरूवात केल्यानंतर गोळा झालेल्या नागरीकांना सुद्धा नेमका प्रकार लक्षात आला आणि नागरीकांच्या गर्दीतील अनेकांनीही सुद्धा युवकाला चांगलाच चोप देत, हात धुवून घेतले. हा प्रकार गस्तीवर असलेले शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या सहकाºयांना कळला. त्यांनी घटनास्थळावर धाव घेत, संजय ताम्बे याला ताब्यात घेतले आणि त्याला सिव्हील लाईन पोलिसांच्या ताब्यात दिले.  विवाहितेच्या तक्रारीनुसार सिव्हील लाईन पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी) 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Bus Standअकोला बस स्थानकCivil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन