पातूरातील युवकाचा स्लॅबवरून कोसळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 18:54 IST2019-07-02T18:53:50+5:302019-07-02T18:54:16+5:30
शुभम विश्वनाथ पोहरे वय २५ वर्षे या युवकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना २ जुलै रोजी दुपारी घडली आहे.

पातूरातील युवकाचा स्लॅबवरून कोसळून मृत्यू
पातूर : पातुरातील भीमनगर परिसरात राहत असलेल्य शुभम विश्वनाथ पोहरे वय २५ वर्षे या युवकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना २ जुलै रोजी दुपारी घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पातूर-वाशिम रोडवरील आरीफ नगर परिसरात एका घराच्या स्लॅबचे काम सुरू असताना सेंट्रींगचे तार बांधत असताना अचानक तोल गेल्यामुळे शुभम पोहरे हा खाली कोसळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला व त्यास ताबडतोब अकोला येथील शासकीय रुग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शुभमच्या मागे आई, वडील, चार बहिणी असा आप्त परिवार आहे. शुभम हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा असल्यामुळे त्याच्या मृत्युमुळे दु:ख व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)