सुदृढ आरोग्यासाठी पोलिसांना ‘योग’ मंत्र!

By Admin | Updated: June 9, 2016 01:58 IST2016-06-09T01:58:57+5:302016-06-09T01:58:57+5:30

योग प्रशिक्षित पोलीस देणार योग-प्राणायामचे धडे.

'Yoga' mantra for healthy health! | सुदृढ आरोग्यासाठी पोलिसांना ‘योग’ मंत्र!

सुदृढ आरोग्यासाठी पोलिसांना ‘योग’ मंत्र!

अकोला: सण, उत्सव, जयंती, ईदसारख्या उत्सवामध्ये पोलिसांना सातत्याने बंदोबस्त करावा लागतो. कामाचा ताण वाढल्याने पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यातून अनेक कर्मचार्‍यांना बळीसुद्धा जावे लागले. पोलिसांवरील ताण कमी व्हावा, त्यांना मानसिक स्वास्थ्य लाभावे, या दृष्टिकोनातून आता पोलिसांना ह्ययोग मंत्रह्ण देण्यात येणार आहे. पोलिसांमधीलच कर्मचार्‍यांनी योग-प्राणायामाचे प्रशिक्षण घ्यावे किंवा ज्यांनी प्रशिक्षण घेतले असेल, अशा कर्मचारी-अधिकार्‍यांची नावे पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविण्याच्या ठाणेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
सहा महिन्यांपूर्वी सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालकांची बैठक गुजरातला झाली होती. या बैठकीमध्ये पोलीस खात्यात योग प्रशिक्षक तयार करण्यावर भर देण्यात आला होता. तसे आदेशही राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले होते; परंतु योग प्रशिक्षणाच्या अंमलबजावणीस पोलीस खात्याला मुहूर्त काही सापडला नाही.
आता राज्याची सूत्रे प्रवीण दीक्षित यांनी स्वीकारल्यानंतर पोलीस खात्यात पुन्हा योग वारे वाहू लागले आहेत. पोलिसांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सततचा बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास यामुळे पोलिसांवर मानसिक ताण पडतो. आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. गत काही वर्षांमध्ये जिल्ह्यात अनेक पोलीस कर्मचार्‍यांना हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांना बळी पडावे लागले आणि त्यात त्यांना प्राण गमवावे लागले. कामाच्या ताणाची स्थिती लक्षात घेता, पोलिसांनी ताण न घेता काम करता यावे, यासाठी योग मंत्राचा उपाय शोधून काढण्यात आला आहे. पोलीस ठाण्यांमधील कर्मचारी-अधिकार्‍यांना योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी ठाण्यातीलच काही कर्मचार्‍यांना योग प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांना योग प्रशिक्षण घ्यावे, त्यासंबधीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा किंवा ज्यांनी योग प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशा पोलीस कर्मचार्‍यांची नावे पोलीस अधीक्षक कार्यालयाला कळविण्याच्या सूचना सर्व ठाणेदारांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: 'Yoga' mantra for healthy health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.