तेल्हाऱ्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरसावली यवतमाळची ‘आर्ट’ संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:22 IST2017-12-20T15:20:19+5:302017-12-20T15:22:54+5:30
तेल्हारा : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळच्या आर्ट संस्थेने पुढाकार घेऊन वर्षभर रेशन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे.

तेल्हाऱ्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरसावली यवतमाळची ‘आर्ट’ संस्था
तेल्हारा : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळच्या आर्ट संस्थेने पुढाकार घेऊन वर्षभर रेशन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. तालुक्यातील तळेगाव बाजार येथील डॉ. सतीश खारोडे व मित्रमंडळाने १८ डिसेंबर रोजी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील जनार्दन खारोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार व्ही.टी. चव्हाण, माजी सरपंच मधुकरराव राऊत, नवनिर्वाचित सरपंच राम खारोडे, सुरेश मानखैर हे होते.
यावेळी तालुक्यातील प्रकाश गुजर, रमाबाई खराटे, सुरेश अवचार, कैलास भोंडे, अकीलखा, जयप्रकाश खारोडे, वंदना बोदळे, माणिकराव कराळे, अंबादास सोळंके, माणिकराव चोपडे इत्यादींच्या कुटुंबीयांना वर्षभराचे रेशन पुरविण्याची जबाबदारी आर्ट संस्था यवतमाळ व केअरिंग फ्रेन्डस् मुंबई यांनी स्वीकारली आहे. यावेळी या कार्यक्रमाला रावसाहेब खारोडे, रामकिरण खारोडे, गुणवंत खारोडे, सदानंद खारोडे, उद्धव मानखैर, बासू अरबट, रफीकभाई, वाहेदभाई, संतोष भड, राजकुमार खारोडे, दीपक खारोडे, अरुण खारोडे, बंडू राऊत, जगदीश खारोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ग्रा.पं. सदस्य शे. मुजफर यांनी केले, तर आभार प्रवीण खारोडे यांनी मानले.