युवक काँग्रेसच्या आकर्षक वेशभूषा स्पर्धेस महिलांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:14 IST2021-06-28T04:14:56+5:302021-06-28T04:14:56+5:30

माता-भगिनींचा वटपौर्णिमेच्या दिवशीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत महिलांचे वटपौर्णिमेच्या दिवशी काढलेले फोटो मागवण्यात आले ...

Women's response to Youth Congress' attractive dress competition | युवक काँग्रेसच्या आकर्षक वेशभूषा स्पर्धेस महिलांचा प्रतिसाद

युवक काँग्रेसच्या आकर्षक वेशभूषा स्पर्धेस महिलांचा प्रतिसाद

माता-भगिनींचा वटपौर्णिमेच्या दिवशीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत महिलांचे वटपौर्णिमेच्या दिवशी काढलेले फोटो मागवण्यात आले होते. त्यामध्ये शहरातील ३७२ महिलांनी सहभाग घेतला. यावेळी प्रथम पारितोषिक ३,००१ रुपये प्रतिभा गिरी या आजींनी मिळविले. व्दितीय २,००१ रुपये कंचन वानखडे यांनी तर तृतीय १,००१ रुपये वैशाली ताले यांनी मिळविले. तसेच क्षमाली घोगरे, यशमा देशमुख व अनिता ईचे यांना प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले. यावेळी रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र व प्रत्येकास एक झाड भेट म्हणून देण्यात आले. कोरोना परिस्थिती बघता विजेत्यांना बक्षीस हे त्यांच्या घरी जाऊन देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सागर कावरे, दिनेश लोहोकार यांनी केले होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी माया इरतकर, रेवती तवर यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, अंकुश भेंडेकर, शिवराज पाटील, प्रशांत प्रधान,धीरज देशमुख, कार्तिक पोदाडे, नीरज खडसे, वैभव इंगोले, सुजय ढोरे, भूषण चतरकर, सागर ढोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Women's response to Youth Congress' attractive dress competition