दारुबंदीसाठी सरसावल्या महिला

By Admin | Updated: April 3, 2017 14:06 IST2017-04-03T14:06:39+5:302017-04-03T14:06:39+5:30

दारुचे दुकान होऊ नये, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले.

Women who want to get alcohol | दारुबंदीसाठी सरसावल्या महिला

दारुबंदीसाठी सरसावल्या महिला

अकोला : पातुर तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतच्या हद्दीत उभारल्या जात असलेल्या दारुच्या दुकानास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. दारुचे दुकान होऊ नये, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले.
पातुर शहरालगतच्या खानापूर हद्दीत जानेवारी महिन्यापासून दारु दुकानाचे काम सुरु आहे. या परिसरात दारुचे दुकान होऊ नये, यासाठी परिसरातील नागरिकांनी मार्च महिन्यात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले होते. त्यानंतरही दुकानाचे काम बंद न झाल्यामुळे अखेर या परिसरातील नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला. खानापूर ग्रामपंचायतच्या हद्दीतील दारु दुकानाचे काम त्वरीत थांबविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. याप्रसंगी प्रविण प्रल्हाद इंगळे यांच्यासह ढोणे नगर, सम्यम कॉलनी, समता नगर या परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Women who want to get alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.