महिलांनी सुरू केला भाडेतत्वावर दुग्ध व्यवसाय
By Admin | Updated: August 4, 2014 00:32 IST2014-08-04T00:32:50+5:302014-08-04T00:32:50+5:30
महिला सक्षमीकरण : १ कोटी रूपये कर्जाचे योग्य नियोजन

महिलांनी सुरू केला भाडेतत्वावर दुग्ध व्यवसाय
वाशिम: स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. महिलांचे सक्षमिकरण व त्यांचे संरक्षण करण्याच्या विडा उलचलेल्या एका संस्थेने १ कोटी रूपयांचे कर्ज प्राप्त करून त्याचे योग्य नियोजन केले. आज वाशिम जिल्हयातील अनेक बचतगटातील महिलांनी भाडे तत्वावर शेती व दुग्ध व्यवसायास सुरूवात करून यशाची पायरी चढत आहेत.
१९९४ पासून महिलांना शासकीय व निमशासकीय सेवेत ३0 टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणामुळे शासकीय सेवेत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या व त्या स्वावलंबी होण्यास मदत झाली. तळागाळातील स्त्री विकासासाठी पंचायत स्तरावर महिलांना ५0 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे तळापर्यंत राजकीय अधिकार प्राप्त होण्यास मदत झाली. अशा प्रकारे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न झाले व केल्या जात आहे.
वाशिम येथील स्वयं शासन बहुउदेशिय महिला विकास संस्थेच्यावतिने जिल्हयाभरात ६५0 बचत गट स्थापन केले. या संस्थेच्या पुढाकाराने तथा मार्गदर्शनामुळे ७0 महिला बचत गटांना विविध व्यवसायासाठी नाबार्ड कडून महिला सक्षमीकरणाकरीता कर्जाची मागणी करण्यात आली. नाबार्डच्यावतिनेही १ कोटी रूपयांचे ऑनलाईन कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. कर्ज मंजुर झालेल्या बचत गटातील महिला या कर्जामधून प्रामुख्याने भाडे तत्वावर शेती व दुग्ध व्यवसाय करीत आहेत. तर काही महिला बचत गटाने मुलांचे शिक्षणाकरीता याचा वापर केला आहे.
स्वयंशासन बहुउदेशिय महिला विकास संस्था वाशिमचे अध्यक्षा कमल माधव इंगोले यांनी सर्व प्रथम महिला सक्षमिकरण दृष्टीने स्वताला सामाजिक कार्यात झोकून दिले व याला संस्थेचे संचालक माधव इंगोले यांनी साथ दिली.जिल्हयाभरात स्थापन करण्यात आलेल्या ६५0 बचत गटांना विविध योजनांची माहिती, बँकेसंदर्भातील माहितीसह आवश्यक प्रशिक्षण दिले. गत दोन महिन्यात नाबार्डच्या मदतीने ६५0 पैकी ७0 महिला बचत गटाना एक कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले त्यामध्ये सावित्रीबाई महिला बचत गट काजळंबा, पंचशिल महिला बचत गट ब्राम्हणवाडा, वाशिम येथील बालाजी महिला बचत गट , कोंडेश्वर महिला बचत गट ,काळे फाईल , चामुंडा माता महिला बचत गट, दुर्गामाता महिला बचत गट, स्वराज महिला बचत गट, आदीमाय शक्ती महिला बचत गट, एकविरा महिला बचत गट, बालाजी महिला बचत गट, दुर्गा महिला बचत गट, भोयता येथील भिमशक्ती महिला बचत गट , एकता महिला बचत गट, आाम्रपाली महिला बचत गट, गौतमी महिला बचत गट, अनसिंग येथील बाबा सैलानी महिला बचत गट, शारदादेवी, महिला बचत गट, शारदा मॉ महिला बचत गट, मॉ वैष्णवी महिला बचत गट, जगदंबा महिला बचत गट, अण्णाभाऊ साठे महिला बचत गट, यशोदा महिला बचत गट, हाजी मस्तान महिला बचत गट, जय संतोषी मॉ महिला बचत गट, मालेगाव येथील जय संतोषी माता महिला बचत गट , शारदा महिला बचत गट, स्वामी सर्मथ महिला बचत गट, नवसिन महिला बचत गट, विठोली येथील लहुजी महाराज महिला बचत गट, दापुरा येथील दयावाणी महिला बचत गट, संत गजानन महाराज महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट, मसनी येथील बसेश्वर महिला बचत गट, नम्रता महिला बचत गट, मिस्टर बालगणेश महिला बचत गटासह अनेक बचत गटांचा समावेश आहे.