महिला व बालविकास मंत्री आज अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST2021-06-11T04:14:05+5:302021-06-11T04:14:05+5:30

सकाळी ६.४५ वाजता त्यांचे अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता शासकीय वाहनाने ...

Women and Child Development Minister in Akola today! | महिला व बालविकास मंत्री आज अकोल्यात!

महिला व बालविकास मंत्री आज अकोल्यात!

सकाळी ६.४५ वाजता त्यांचे अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता शासकीय वाहनाने दर्यापूर जिल्हा अमरावतीकडे त्या प्रयाण करणार आहेत.

..................................................

जि.प.सर्वसाधारण सभा

ऑफलाइन घेण्याची तयारी

अकोला: जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २३ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने सभागृहात घेण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.

...........................................................

कार्यालयांच्या परिसरात होऊ लागली गर्दी!

अकोला: कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आदी शासकीय कार्यालयांच्या परिसरात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. निर्बधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी, कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Web Title: Women and Child Development Minister in Akola today!