मोटारसायकल अपघातात एक महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 20:10 IST2017-08-01T20:08:28+5:302017-08-01T20:10:20+5:30
गांधीग्राम : अकोला येथील दोघेजण १ आॅगस्ट रोजी मोटारसायकलने अकोटकडे जात असताना गांधीग्रामजवळ त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर तिचा मुलगा जखमी झाला.

मोटारसायकल अपघातात एक महिला ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गांधीग्राम : अकोला येथील दोघेजण १ आॅगस्ट रोजी मोटारसायकलने अकोटकडे जात असताना गांधीग्रामजवळ त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर तिचा मुलगा जखमी झाला. हा अपघात अज्ञात वाहनाने जवळून कट मारल्याने घडला.
अकोला येथील राहुल मोहन करोसिया (२५) हे त्यांची आई किरण मोहन करोसिया (४५) यांच्यासह १ आॅगस्टच्या सकाळी एमएच ३० आर ११५८ क्रमांकाच्या मोटारसायकलने अकोटकडे जात असताना गांधीग्रामजवळ त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. त्यामुळे दोघेही रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. किरण करोसिया यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर राहुल जखमी झाला आहे. या घटनेची माहिती कळताच दहीहांडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनात दिलीप इंगळे, मुन्ना ठाकूर, अशोक पाटील, जमादार वाघळकर हे करीत आहेत.