Woman dies after getting stuck in threshing machine | मळणीयंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

मळणीयंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

बार्शीटाकळी : धाबा पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या राजनखेड तांडा येथील इसमाने गावा शेजारील शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ एप्रिल रोजी दुपारी घडली. रामधन मणीराम जाधव (५५) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास धाबा पोलीस चौकीचे बीट जमादार वाडेकर करीत आहेत.

ऑटो व दुचाकीची धडक, चार जखमी

बार्शिटाकळी : अकोला ते बार्शिटाकळी रोडवर पेट्रोल पंपाजवळ ऑटो व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. यामध्ये ऑटोचालक, दुचाकीस्वार यांच्यासह चार जण जखमी झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी दुपारी घडली. ऑटो क्रमांक एमएच ३० बी २७५७ व दुचाकी क्रमांक एमएच ३० डब्ल्यू ५८४४ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात एक बारा वर्षाचा मुलगा, एक महिला व दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Woman dies after getting stuck in threshing machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.