बाळ पळविणार्‍या महिलेची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 20:11 IST2017-11-19T20:03:09+5:302017-11-19T20:11:58+5:30

सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्र. २३ मधून लहान बाळाला  पळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेची पोलीस कोठडी संपल्याने तिला  न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या महिलेची शनिवारी न्यायालयीन  कोठडीत रवानगी केली.

woman in custody, who try to stolen newborn baby | बाळ पळविणार्‍या महिलेची कारागृहात रवानगी

बाळ पळविणार्‍या महिलेची कारागृहात रवानगी

ठळक मुद्दे‘सर्वोपचार’मधून लहान बाळ पळविण्याच्या प्रयत्नात होती महिलाआरोपी महिलेला शनिवारपर्यंत न्यायालियन कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्र. २३ मधून लहान बाळाला  पळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेची पोलीस कोठडी संपल्याने तिला  न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या महिलेची शनिवारी न्यायालयीन  कोठडीत रवानगी केली.
सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्र. २३ मधून लहान बाळ पळविण्याच्या प्रयत्नात  असलेल्या जुलिया रिसाह (रा. बिहार) हिला महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या  सुरक्षारक्षक प्रतिभा लांडे यांनी पकडले होते. त्यांनी सहकारी फहिम शेख, दिलीप  अंभोरे, दत्ता बोके, रवी रुडे यांच्या मदतीने त्या महिलेला सिटी कोतवाली  पोलिसांच्या ताब्यात दिले. या कर्मचार्‍यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस  ठाण्यात जुलिया रिसाह हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वेडसर  असलेल्या या महिलेचे बोलणे पोलिसांना काहीच न कळल्याची माहिती आहे. तिला  अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने प्रथम  या महिलेस पोलीस कोठडी सुनावली तर शनिवारी पोलीस कोठडी संपल्याने तिची  कारागृहात रवानगी केली.

Web Title: woman in custody, who try to stolen newborn baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.