witnesses in murder case commit Suicide | हत्याकांडातील साक्षीदाराची गळफास घेऊन आत्महत्या
हत्याकांडातील साक्षीदाराची गळफास घेऊन आत्महत्या


अकोला: डाबकी रोडवरील राजेश पिंपळे हत्याकांडातील साक्षीदार ५३ वर्षीय मधुकर शेषराव म्हैसने याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मधुकर म्हैसने यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मधुकर म्हैसने हे राजेश सुधाकर पिंपळे हत्याकांडातील एकमेव साक्षीदार होते. त्यांची साक्षही पोलिसांनी नोंदविली होती. १८ सप्टेंबर रोजी रात्री किरकोळ वादातून आरोपी नवनाथ बंडू करंडे याने राजेश पिंपळे याची हत्या केली होती. आता साक्षीदाराने आत्महत्या केल्यामुळे हत्याकांड प्रकरणाला कलाटणी मिळणार आहे. (प्रतिनिधी)


Web Title: witnesses in murder case commit Suicide
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.