शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

मागण्यांबाबत स्पष्टता नसल्याने आंदोलन मागे घेणार नाही - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 2:18 AM

राज्य शासनाची शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत स्पष्टता नसून, शासन  गोलमाल उत्तरे देऊन आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे; परंतु आमच्या मागण्या पूर्ण  झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तु पकर, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार, प्रशांत गावंडे यांनी मंगळवारी  पत्रकारांसोबत बोलताना जाहीर केले. 

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा!शिवसेना जिल्हाप्रमुख, पदाधिकार्‍यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाची शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत स्पष्टता नसून, शासन  गोलमाल उत्तरे देऊन आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे; परंतु आमच्या मागण्या पूर्ण  झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार, प्रशांत गावंडे यांनी मंगळवारी  पत्रकारांसोबत बोलताना जाहीर केले. हे आंदोलन मागे घेण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना चर्चा  करण्यासाठी पाठविले. तेव्हा शेतकरी जागर मंचाने कपाशीवरील बोंडअळीमुळे शेतकर्‍यांचे मोठे  नुकसान झाल्याने, त्यांना एकरी ५0 हजार रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली.  शासनाने केवळ सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. नाफेडच्या मागणीबाबतही,  मूग, उडीड, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांसाठी भावांतराची योजना लागू करण्याबाबत  शासन अनुकूल नाही. सरसकट कर्जमाफीची मागणी असून, शासन म्हणते, कर्जमाफी दिलेली  आहे. कृषी पंप वीज बिलाबाबत शासनाची भूमिका नकारात्मक आहे; परंतु कृषी पंपांची वीज  जोडणी न तोडण्याचे आदेश आम्ही दिले असल्याचे शासनाचे म्हणणे असल्याचे प्रशांत गावंडे  यांनी सांगितले. सोने तारण कर्ज माफ करण्याबाबतही शासन उदासीन आहे. त्यामुळे आम्ही शे तकर्‍यांचे आंदोलन मागे घेणार नाही, असेही रविकांत तुपकर, प्रशांत गावंडे यांनी जाहीर केले. 

शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा!राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस मुख्यालयात स्थानबद्ध करण्यात आलेल्या शे तकर्‍यांची भेट घेऊन, पाठिंबा जाहीर केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री गुलाबराव गावंडे,  प्रदेश सरचिटणीस श्रीकांत पिसे पाटील, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, प्रा. सरफराज  खान, दिलीप बगडिया, अनिल मालगे, शौकत अली शौकत, मधुकर साबळे, निसार खान,  संग्राम गावंडे, बाबासाहेब घुमणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

शिवसेना जिल्हाप्रमुख, पदाधिकार्‍यांची भेटशेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, शहर प्रमुख राजेश  मिश्रा,अतुल पवनीकर, तरुण बगेरे, योगेश अग्रवाल, दिनेश सरोदे व केदार खरे यांनी भेट दिली.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरYashwant Sinhaयशवंत सिन्हाAkola cityअकोला शहर