गजानन कांबळे यांच्यावरील दाखल गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:16 IST2021-02-05T06:16:57+5:302021-02-05T06:16:57+5:30
अकाेला : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अकाेला महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांच्याविरुद्ध जुने शहर पाेलीस ठाण्यात दाखल करण्यात ...

गजानन कांबळे यांच्यावरील दाखल गुन्हे मागे घ्या
अकाेला : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अकाेला महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांच्याविरुद्ध जुने शहर पाेलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे या मागणीसाठी रिपाइंप्रणीत बहुजन विद्यार्थी परिषदेने साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन दिले. या वेळी जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.
रिपाइंचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांचे जिल्ह्यातील राजकीय वलय वाढत आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पाेहाेचविण्यासाठी गजानन कांबळे कार्य करीत आहेत. मात्र हा विचार प्रस्थापित राजकीय पक्षांना सहन हाेत नसल्याने त्यांना विनाकारण काेणत्या ना काेणत्या गुन्ह्यामध्ये अडकवून गुंतवून ठेवण्याचा प्रकार सध्या अकाेल्यात सुरू आहे. त्यांचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आराेप राेहित वानखडे यांनी या वेळी केला. जुने शहर पाेलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीनुसार शेख वाहेद माे. याकुब यांना काही युवकांनी मारहाण केली. तसेच गजानन कांबळे यांच्या इशाऱ्यावरून युवकांनी मारहाण केली, तर कांबळे यांनी खिशातील २० हजार रुपयांची रक्कम काढली, असे तक्रारीत नमूद आहे. पाेलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी यांनी काेणताही तपास न करता एफआयआर दाखल केला असून ठाणेदार महेंद्र देशमुख यांनीही त्यांना चुकीचे पाठबळ दिल्याचे राेहित वानखडे यांचे म्हणणे आहे. तक्रार दिल्यानंतर घटनास्थळावर जाऊन पाेलिसांनी सत्यता तपासणे गरजेचे हाेते. असे असतानाही गजानन कांबळे हे घटनास्थळावर हाेते किंवा नाही याची कुठलीही शहानिशा न करता पाेलिसांनी गुन्हे दाखल करण्याची घाई केली. ज्या दिवशी ही मारहाण झाली त्या वेळी गजानन कांबळे हे नागपूर येथून अकाेलाकडे परत येत हाेते. उच्च न्यायालयात ते एका प्रकरणाच्या चाैकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता नागपूर येथेच हाेते. त्या संदर्भातील नागपूरनजीकच्या टाेल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच त्यांची चारचाकी गाडी या सर्व बाबींचे पुरावे कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले आहेत. राजकीय पक्षांच्या दबावाखाली गजानन कांबळे यांची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. त्याचाच बळी गजानन कांबळे ठरल्याचेही वानखडे यांनी या वेळी स्पष्ट केले. या प्रकरणाची सत्यता समाेर आणण्यासाठी पाेलिसांनी सखाेल तपास करावा तसेच दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. धरणे आंदाेलनासाठी राेहित वानखडे, युवराज भागवत, राजकुमार शिरसाट, ॲड. प्रकाश आठवले, शुक्लाेधन वाहुरवाघ, अनिल पहुरकर, विद्यानंद क्षीरसागर, विजय सावंत, मनाेज गमे, वैभव वानखडे, विजू टाेम्पे, संताेष दाभाडे, मनाेज भालेराव, संगीता गवई, कुसुम वघमारे, शाेभा तायडे, गुंफाबाई वानखडे, शीला कांबळे, फुलाबाई इंगळे, आशा घुगे, संगीता वानखडे यांच्यासह शकडाे महिला व पुरुष पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित हाेते.