जिल्हयातील दलित वस्ती कामांचा आराखडा तयार करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST2021-05-22T04:18:13+5:302021-05-22T04:18:13+5:30

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास योजनेंतर्गत जिल्हयात २०२१....२२ ते २०२५....२६ या पाच वर्षांच्या कालावधीत करावयाच्या नवीन कामांचा ...

Will prepare a plan for Dalit settlement works in the district! | जिल्हयातील दलित वस्ती कामांचा आराखडा तयार करणार!

जिल्हयातील दलित वस्ती कामांचा आराखडा तयार करणार!

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास योजनेंतर्गत जिल्हयात २०२१....२२ ते २०२५....२६ या पाच वर्षांच्या कालावधीत करावयाच्या नवीन कामांचा बृहद आराखडा तयार करण्याचा ठराव जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. नवीन कामांचा बृहद आराखडा तयार करण्यासाठी जिल्हयातील पंचायत समितीनिहाय कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हयातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या मुद्दयांवही या सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाइन पध्दतीने घेण्यात आलेल्या या सभेत समिती सदस्य आम्रपाली खंडारे, माया नाइक, प्रशांत अढाऊ, वंदना झळके यांच्यासह जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

...........................फोटो...............................................

Web Title: Will prepare a plan for Dalit settlement works in the district!