शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांच्या शिकारीची टोळी सक्रीय

By admin | Updated: February 12, 2015 00:18 IST

कातडी व मांसाची केल्या जाते विक्री.

अकोला: वर्‍हाडातील अभयारण्यांमध्ये रानडुक्कर, रोही व हरिण आदी वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी े सक्रीय असून, शुक्रवारी झालेल्या बिबट्याच्या शिकारीवरून हा प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाने आरोपींना अटक केल्यानंतर यापूर्वीही त्यांनी कोल्ह्यासह अन्य प्राण्यांचीही शिकार केल्याची कबुली दिली. अकोला, वाशिम, बुलडाण्यासह अमरावती विभागातील शेतांमध्ये गत काही वर्षांपासून रानडुक्कर, रोही व हरिणांचा वावर वाढला आहे. ही जनावरे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असला तरी वन्य प्राण्यांची शिकार करणार्‍यांना फावत आहे. रानडुक्कर, हरिणाचे मांस तसेच कातडी व शिंगाचीही विक्री केली जाते. वेळप्रसंगी वाघ व बिबट्याचीही शिकार करण्यात येते. पातूर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या चोंढी बिटमधील जांब शिवारात एका नाल्यात ७ फेब्रुवारी रोजी बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात बिबट्याचा विजेच्या शॉकमुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरून वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी चौघांना अटक केली.त्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी यापूर्वीही रानडुक्कर, रोही व कोल्ह्याची शिकार केल्याचे उघडकीस आले आहे. जांब शिवारात बिबट्याची शिकार करणार्‍यांनी बिबट्याच्या कातड्याच्या तस्करीसाठी प्रयत्न चालविले होते. त्यातून ही टोळी पकडली गेली. अन्य अभयारण्यांमध्येही अशाप्रकरणे प्राण्यांची शिकार करण्यात येत असल्याची शक्यता असून, वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. यासंदर्भात , उप वनसंरक्षक - प्र. ज. लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली असल्याची माहिती दिली. रानडुकराच्या शिकारीसाठी सापळा लावला होता. त्यामध्ये बिबट्याचा अडकल्याने मृत्यू झाला. यापूर्वीही कोल्ह्यासह त्यांनी वन्य प्राण्यांची शिकार केली आहे. आरोपींकडून आणखी माहिती काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. *शिकार करण्याची पद्धत रानडुक्कर, हरिण किंवा रोही हमखास शेतात येत असल्याची खात्री असल्यामुळे शिकार्‍यांनी विद्युत तारेचा धक्का देवून शिकार करण्याची पद्धत अवलंबली आहे. शेतांमध्ये खुंट्या रोवून त्याला तार बांधण्यात येते. या तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात येतो. या तारांचा शॉक लागून प्राण्याचा मृत्यू होतो. यानंतर हे शिकारी त्या प्राण्याचे कातडे, हाडे, शिंगे व मांस विकतात.