शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अपघातप्रवण स्थळ दर्शविणारे फलक गेले कोठे?

By admin | Updated: May 12, 2014 22:33 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र .६ वर अपघातांच्या संख्येत वाढ

बाभुळगाव जहागीर: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अकोला ते मूर्तिजापूरदरम्यान अनेक अपघातप्रवण स्थळे असून, या ठिकाणी बरेच अपघात घडून अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. ही अपघातप्रवण स्थळे दर्शविण्यासाठी फलकही लावण्यात आले होते; परंतु गत काही महिन्यांपासून असे अनेक फलक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून दिसेनासे झाले आहेत, तर काही फलकच अपघातग्रस्त झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.
सुरत-कोलकाता या १९४९ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर हे तीन जिल्हे येतात. अक ोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोला, बोरगाव मंजू, कुरणखेड, मूर्तिजापूर ही महत्त्वाची शहरे या मार्गावर आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर गत काही महिन्यांत अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर ते अकोलादरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात घडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांना आपले अवयवही गमवावे लागले आहेत. या रस्त्यावर अनेक अपघातप्रवण स्थळ आहेत. त्याची माहिती दर्शविणारे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले होते; परंतु त्यातील बरेचशे फलकच अपघातग्रस्त झाले, तर अनेक फलक दिसेनासे झाले आहेत. या महामार्गावर अनेक ठिकाणी कठडे नसलेले पूल असून, वाहनचालकांना त्याची सूचना देणारे फलकही लावण्यात आलेले नाहीत. काही वळणरस्त्यावरही फ लक नाहीत. त्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, संबंधित विभागाकडून त्याची थोडीही दखल घेण्यात आल्याचे दिसत नाही. अकोला शहरालगत असलेल्या बाभुळगाव जहागीरनजीकच्या शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असलेल्या धोक्याच्या वळणावर त्याची सूचना देणारा फलक नाही. मूर्तिजापूर शहराच्या जवळ असलेल्या वणीरंभापूर येथील कुष्टधामनजीक धोक्याच्या वळणावरील फलकही गायब झाला आहे. महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी याची गंभीर दखल घेऊन नादुरुस्त असलेल्या फलकांची दुरुस्ती करावी आणि आवश्यक ठिकाणी फलक लावून अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी वाहनधारक आणि जनतेकडून करण्यात येत आहे.