जिल्ह्यातील एसटी बसची चाके थांबली; फेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 19:30 IST2021-05-10T19:30:43+5:302021-05-10T19:30:48+5:30
Akola News : संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी १० ते ११ बसेस सुरू होत्या.

जिल्ह्यातील एसटी बसची चाके थांबली; फेऱ्या रद्द
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कळक निर्बंध लावण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्थापन ठेवण्यात आल्याने एसटी बसच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी १० ते ११ बसेस सुरू होत्या.
कोरनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. यामध्ये महामंडळाच्या एसटी बसला सूट देण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेसाठी बसेस सोडता येत होत्या. जिल्ह्यामध्ये दहा ते अकरा बसेस २२ प्रवासी क्षमतेने सुरू होत्या. या बसच्या माध्यमातून महामंडळाला नफा होत नसला तरी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना फायदा होत होता; मात्र जिल्ह्यात कोरनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लावले. त्यामध्ये सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेल्या बसेसही बंद ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील मध्यवर्ती आगारातून एकही बसफेरी सोडण्यात आली नाही. पुढील आदेशापर्यंत बससेवा बंद ठेवण्यात येणार आहे.