टीव्ही चालू करायला गेला, अन् जीवाला मुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 17:13 IST2022-06-28T17:12:34+5:302022-06-28T17:13:12+5:30

Accident News : उमेश रमेश डोईफोडे (३९) असे मृतकाचे नाव आहे.

Went to turn on the TV and died due to electrick shock | टीव्ही चालू करायला गेला, अन् जीवाला मुकला

टीव्ही चालू करायला गेला, अन् जीवाला मुकला

मूर्तिजापूर : तालुक्यातील गोरेगाव (पुंडलिक महाराज) येथील इसमाचा घरातील टीव्ही चालू करीत असताना वीजेचा जोरदार धक्का बसल्याने ३९ वर्षिय इसमाचा जागीचच मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली. उमेश रमेश डोईफोडे (३९) असे मृतकाचे नाव आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोरेगाव येथील उमेश रमेश डोईफोडे (३९) हे घरातील टीव्ही सुरु करण्यासाठी बोर्डाला पीन जोडत असताना त्यांना वीजेचा जोरदार धक्का लागल्याने ते घटनास्थळीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथे आणला. अधिक तपास बोरगाव मंजू पोलिस करीत आहेत.

 
ओम आणि दिव्या झाले अनाथ

 मृतक उमेश डोईफोडे हे आपल्या ओम (१२) आणि दिव्या (९) या दोन अपत्यासह राहत, मजूरी करुन आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. उमेश हे आईवडलांना एकटेच होते. त्यांच्या आईचे २००७ मध्ये, वडिलांचे २०१४ तर पत्नीचे १०१७ मध्ये आकस्मिक निधन झाले. त्यामुळे दोन लेकरांचा सांभाळ करीत असताना मंगळवारी उमेश यांचाही आकस्मिक मृत्यू झाल्याने    ओम (वर्ग ५ वा) व दिव्या (वर्ग ३ रा) या चिमुकल्यावर आभाळ कोसळले आहे.

Web Title: Went to turn on the TV and died due to electrick shock