श्री संत वासुदेव महाराजांच्या पालखीचे शिर्ला येथे स्वागत
By Admin | Updated: June 15, 2017 20:19 IST2017-06-15T20:04:54+5:302017-06-15T20:19:43+5:30
शिर्ला : श्री संत वासुदेव महाराजांच्या पालखीचे शिर्ल्यात सर्वधर्मसमभावाने स्वागत करण्यात आले. शिर्ला बसथांब्यावर श्री संत वासुदेव महाराजांच्या पालखीचे दुपारी आगमन झाले.

श्री संत वासुदेव महाराजांच्या पालखीचे शिर्ला येथे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : श्री संत वासुदेव महाराजांच्या पालखीचे शिर्ल्यात सर्वधर्मसमभावाने स्वागत करण्यात आले. शिर्ला बसथांब्यावर श्री संत वासुदेव महाराजांच्या पालखीचे दुपारी आगमन झाले. ग्रामपंचायत सदस्य सुनील अंधारे आणि प्रतिभा अंधारे यांनी पालखीचे विधिवत पूजन केले. काहीकाळ विश्रांतीसाठी वारकरी थांबले तेव्हा वैष्णवी अंधारे, अंकुश अंधारे, आकाश लांडे यानी फराळ वितरित केला. सेवानिवृत्त नायब तहसीलदार दामोदर अंधारे, सामाजिक कार्यकर्ते संजय शिरसाट, ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, महसूल विभागाचे नंदकिशोर जाने, शहीद सैनिकाचे वडील काशीराम निमकंडे, माजी सरपंच राजूभाऊ कोकाटे, प्रवीण अंधारे, विठ्ठल निमकंडे आदींसह येथील भजनी मंडळ उपस्थित होते. तेथील विश्राम आटोपल्यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.