अहमदाबाद- हावडा दरम्यान साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:23 IST2021-06-09T04:23:48+5:302021-06-09T04:23:48+5:30

मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ कार्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, ०२४११ अहमदाबाद - हावडा ही विशेष गाडी अहमदाबाद येथून ९ ...

Weekly special trains between Ahmedabad and Howrah | अहमदाबाद- हावडा दरम्यान साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या

अहमदाबाद- हावडा दरम्यान साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या

मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ कार्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, ०२४११ अहमदाबाद - हावडा ही विशेष गाडी अहमदाबाद येथून ९ जून ते ३० जून या कालावधीत सायंकाळी १६.३० वाजता सुटेल आणि हावडा येथे तिसऱ्या दिवशी ०५.१५ वाजता पोहोचेल.

०२४१२ हावडा - अहमदाबाद ही विशेष गाडी हावडा येथून ७ जून ते २८ जून या कालावधीत दुपारी १४.३५ वाजता सुटेल आणि अहमदाबाद येथे तिसऱ्या दिवशी ००.२० वाजता पोहोचेल.

या गाड्यांना नडियाद, आनंद, वडोदरा, सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राऊलकेला, चक्रधरपूर , टाटानगर, खरगपूर या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

केवळ कंफर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Web Title: Weekly special trains between Ahmedabad and Howrah