शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’तील उद्योग पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 5, 2016 03:07 IST

कुंभारी तलाव आटला; पाणी पुरवठय़ासाठी विहिरी केल्या अधिग्रहित.

राम देशपांडे / अकोलाऔद्योगिक परिसराला खांबोरा प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा नोव्हेंबर २0१४ मध्ये बंद झाल्यानंतर, औद्योगिक विकास महामंडळाने कुंभारी तलावातून पाणीपुरवठा सुरू केला; मात्र वाढत्या तापमानामुळे कुंभारी तलाव आटत चालला असून, निम्म्यापेक्षाही कमी म्हणजे 0.९ दश्लक्ष घनमीटरपर्यंत हा पाणीपुरवठा येऊन ठेपला आहे. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेऊन, औद्योगिक विकास महामंडळाने परिसरातील विहिरी अधिग्रहित केल्या. तथापि, पाच विहिरींपैकी केवळ एकच विहीर पाणीपुरवठा करण्यास सक्षम असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे औद्योगिक परिसरातील जेमतेम तग धरून असलेले उद्योग पाण्याअभावी बंद पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. चार फेजमध्ये विभागलेल्या औद्योगिक परिसरातील एकूण १ हजार १९२ उद्योजकांनी पाणीवापराबाबत औद्योगिक विकास महामंडळाकडे नोंदणी केली आहे; मात्र त्यापैकी ५९२ उद्योग पाणीपुरवठय़ाअभावी पूर्णत: बंद पडले असून, उर्वरित ६00 उद्योग पाटबंधारे विभागाच्या कुंभारी प्रकल्पातील पाणीपुरवठय़ावर तग धरून आहेत. औद्योगिक परिसरातील उद्योगांना ११ नोव्हेंबर २0१४ पूर्वी खांबोरा प्रकल्पातून प्रतिदिन २0 लाख लिटर (२ एमएलडी) पाणीपुरवठा व्हायचा; मात्र पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेऊन, तो बंद करण्यात आला. त्यानंतर २0 नोव्हेंबर २0१४ पासून कुंभारी प्रकल्पातून प्रतिदिन १0 लाख २0 हजार लिटर (१.२ एमएलडी) एवढा पाणीपुरवठा करण्यात आला; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून प्रतिदिन ९0 हजार लिटर (0.९ एमएलडी) एवढय़ावर येऊन ठेपलेल्या या पाणीपुरवठय़ात आणखी कपात करण्यात आली असून, २८ एप्रिलपासून तो प्रतिदिन ७ लाख ५0 हजार लिटर (0.७५ एमएलडी) एवढय़ावर येऊन ठेपला आहे. एकीकडे झपाट्याने होत असलेले बाष्पीभवन, तर दुसरीकडे याच प्रकल्पातून मलकापूर ग्रामपंचायतीला सुरू असलेला पाणीपुरवठा या दोन प्रमुख बाबींमुळे कुंभारी तलाव आटत चालला आहे.