शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वान धरणाच्या पाण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकर्‍यांचा जलसमाधीचा इशारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 19:50 IST

वान धरणाचे पाणी रब्बी पिकांना ७ डिसेंबर पर्यंत न सोडल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा  वाडी अदमपूर परिसरातील शेतकर्‍यांनी तेल्हारा तहसिलदारांकडे ५ डिसेंबरला निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देरब्बी हरभरा पेरुन एक महिन्याचा कालावधी उलटला७ डिसेंबरपर्यंत धरणाच्या कालव्यात पाणी सोडा - शेतकर्‍यांची मागणीतेल्हारा तहसिलदारांना निवेदनाद्वारे दिला जलसमाधीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवाडी अदमपूर (अकोला): वान धरणाचे पाणी रब्बी पिकांना ७ डिसेंबर पर्यंत न सोडल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा  वाडी अदमपूर परिसरातील शेतकर्‍यांनी तेल्हारा तहसिलदारांकडे ५ डिसेंबरला निवेदनाद्वारे दिला आहे. वाडी अदमपूर येथील शेतकर्‍यांनी आपल्या शेतात रब्बी पिक हरभरा पेरुन एक महिन्याचा कालावधी होवून गेला. परंतु पाणी सोडण्याचे आश्‍वासन देऊन अद्यापपर्यंत वान धरणाच्या कालव्याला पाणी सोडण्यात न आल्याने रब्बी पिक हरभरा धोक्यात आले आहे. हरभरा पिक फुलोरावर आल्याने पाण्याची आवश्यकता आहे. वान धरणाच्या कालव्याला ७ तारखेपर्यंत पाणी न आल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा निवेदनाद्वारे वाडी अदमपूर येथील शेतकरी शरद वाघ, विष्णु वाघ, गोविंद अवचार, अनंत तळोकार, योगेश तिव्हाणे, विठ्ठल तिव्हाणे, सिद्धेश्‍वर तिव्हाणे, विष्णु शेळके, रविंद्र घोराळ, प्रविण शर्मा, दिलीप तिव्हाणे, सुरेंद्र भोंगळ, संजय राठी, सचिन धोटे, अनील खारोडे, गोपाल भाकरे, विनोद भोंगळ, संजय तिव्हाणे, गजानन निर्मल आदी शेतकर्‍यांनी लेखी निवेदनाद्वारे तेल्हारा तहसिलदारांकडे मागणी केली आहे.

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पTelharaतेल्हाराAkola Ruralअकोला ग्रामीण