कालव्याला तडे गेल्याने पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST2021-02-09T04:21:40+5:302021-02-09T04:21:40+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथे शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून धरणाची उभारणी केली. उतावळी प्रकल्पाच्या देऊळगाव येथील धरणापासून उमरा-पांगरा, चान्नी, ...

कालव्याला तडे गेल्याने पाण्याचा अपव्यय
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथे शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून धरणाची उभारणी केली. उतावळी प्रकल्पाच्या देऊळगाव येथील धरणापासून उमरा-पांगरा, चान्नी, खेट्री, चतारी मार्गे सस्तीपर्यंतच्या कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांकरिता पाणी पुरवठा करण्यात येतो. या वर्षात समाधानकारक पाऊस झाल्याने उतावळी प्रकल्पाचे धरण शंभर टक्के भरले. दरम्यान, सदरच्या धरणाचे पाणी कालव्यामार्फत चान्नी, खेट्री, चतारी येथील शेतकऱ्यांना रबी हंगामातील पिकांना देण्यात येत आहे. परंतु पातूर तालुक्यातील चान्नी, खेट्री, चतारी, सस्तीपर्यंतच्या कालव्याला बहुतांश ठिकाणी तडे गेले आहेत. तसेच टी-पॉइंटचे गेट नादुरुस्त असल्याने कालव्यातून जवळपास ५० टक्के पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याचा होणारा अपव्यय थांबविण्याकरिता पातूर तालुक्यातील चान्नी ते सस्तीपर्यंतच्या कालव्याची लायनिंग करून काँक्रिटीकरण करण्यासाठी संबंधित विभागाला निधी उपलब्ध करावा, अशा मागणी निवेदनाद्वारे चतारी येथील पोलीस पाटील विजय सरदार यांनी केली.