शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाक्या गाळाने भरल्या!

By admin | Updated: June 17, 2015 02:15 IST

स्वच्छ करण्याचे गटविकास अधिका-यांना आदेश.

अकोला : जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या ४६0 पाणी साठवण टाक्यांची वर्षानुवर्षांपासून स्वच्छताच झाली नाही. त्यामुळे या टाक्या गाळाने भरल्या असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व टाक्या पंधरा दिवसांत स्वच्छ करण्याचे आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी दिलेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामपंचायतींच्या हद्दीत विविध योजनांतर्गत पाणीपुरवठा योजना राबविली जाते. जिल्ह्यात या योजनांसाठी ४६0 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांची देखभाल दुरुस्ती हा ग्रामपंचायतच्या कामाचा भाग आहे. पाणीपट्टी वसूल करून ग्रामस्थांना स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी पंचायत विभागाची आहे. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा सहकार्य करीत असते; मात्र पंचायत आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग या दोन्ही यंत्रणांकडून वर्षानुवर्षांपासून पाणी साठवण टाक्यांची स्वच्छताच झाली नाही. त्यामुळे पाण्यासोबत वाहून आलेला गाळ साठवण टाक्यांमध्ये जमा झाला आहे. त्यामुळे टाक्यांची साठवण क्षमता तर कमी झालीच, शिवाय गाळामुळे पाणी दूषित होऊन ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब एका पाहणीत आढळून आल्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी तातडीने आदेश काढून सर्व गटविकास अधिकार्‍यांना साठवण टाक्यांमधील गाळ काढून टाक्या स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. पंधरा दिवसांत टाक्यांची गाळ काढून स्वच्छता करून तसा अहवाल ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत.