टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करा! - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 13:08 IST2019-05-08T13:08:36+5:302019-05-08T13:08:43+5:30
अकोला: जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदारांना ६ मे रोजी पत्राद्वारे दिले.

टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करा! - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
अकोला: जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदारांना ६ मे रोजी पत्राद्वारे दिले.
तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमधील भूजल पातळी खोल जात असल्याने, नागरिकांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी टँकरद्वारे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना ६ मे रोजीच्या पत्राद्वारे दिले आहेत.
टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन करा!
टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना प्रस्तावित गावातील लोकसंख्या व जनावरांच्या संख्येचे प्रमाण लक्षात घेऊन, दररोज टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण निश्चित करून, टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांमार्फत टँकरच्या फेºया ठरविण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा वितरणातील अनियमितता टाकळण्यासाठी व संनियंत्रणाच्या दृष्टीने ‘जीपीएस’ प्रणालीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे, असेही जिल्हाधिकाºयांनी एसडीओ-तहसीलदारांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.