अकोला शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:03 IST2019-06-10T13:03:02+5:302019-06-10T13:03:09+5:30
शहरातील काही भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.

अकोला शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद
अकोला: शहरातील जेल चौक येथे ६५ एमएलडी प्लांटवरून येणारी नवीन जलवाहिनी जोडणीचे काम १० व ११ जून रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.
जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे केशवनगर, आदर्श कॉलनी, तोष्णीवाल ले-आउट, नेहरू पार्क, हरिहरपेठ, रेल्वे स्थानक, महाजनी प्लॉट परिसरातील जलकुंभ प्रभावित होणार आहेत. त्यामुळे या जलकुंभ परिसरातील पाणी पुरवठा सोमवार आणि मंगळवारी बंद राहणार आहे. या भागातील पाणी पुरवठा खंडित असला, तरी बसस्थानक आणि शिवनगर जलकुंभ परिसरातील पाणी पुरवठा पूर्ववत सुरू राहणार असल्याची माहिती शहर अभियंता सुरेश हुंगे यांनी दिली.