शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

पाणीटंचाई आराखडा पुढील महिन्यात होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 3:00 PM

सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या निरंक असल्याचा अहवाल आहे.

अकोला : चालू वर्षातील पावसाळा पुरेसा आणि जमिनीत पाणी मुरवणारा झाल्याने दरवर्षी उद्भवणारी पाणीटंचाईची समस्या अद्याप निर्माण झाली नाही. त्याचवेळी टंचाईसाठी प्रमाण मानले जाणाऱ्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा विहिरींचा पाणी पातळी अहवालही नोव्हेंबरऐवजी जानेवारीमध्ये तयार केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई आराखडाही त्यानंतरच तयार केला जाणार असल्याची माहिती आहे.भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात सात तालुक्यांमधील निरीक्षण विहिरीतील भूजल पातळीच्या अहवालावरून जिल्ह्यात आगामी काळातील पाणीटंचाईची समस्या पुढे येऊ शकते. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळा होतो. या काळात झालेल्या पावसावर भूजल पातळी जानेवारी महिन्यापर्यंत स्थिर राहते. यावर्षी परतीचा पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळीवरही परिणाम झाला. येत्या काही दिवसांत पिकांसाठी पाण्याचा उपसा वाढणार आहे. त्यानंतर भूजलाची पातळी निश्चित करण्यास अनुकूल काळ निर्माण होईल. त्यामुळे चालू वर्षात नोव्हेंबरऐवजी डिसेंबर, जानेवारी महिन्यातच भूजल पातळी नोंदविण्याची तयारी भूजल सर्वेक्षण विभागाने केली आहे. त्या अहवालानंतर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आराखडाही निश्चित होणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या निरंक असल्याचा अहवाल आहे.पाणी जिरण्यालाही लागतो वेळ!महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सर्वेक्षणानुसार, आपण जे जमिनीतील पाणी वापरतो, ते ५० ते १०० वर्षे अगोदर जमिनीत जिरलेले असू शकते. जमिनीत पाणी जिरताना १०० फूट खोलानंतर एक फूट खाली जाण्यासाठी पाण्याला चार महिने (१२० दिवस) लागतात. नैसर्गिक स्रोत हाच एकमेव पर्याय असल्याने पाणी किती आणि कसे वापरावे, याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे.

गतवर्षीची तालुकानिहाय घटतेल्हारा तालुक्यामध्ये पाणी पातळीत तब्बल ३.०७ मीटरने घट झाली होती. बाळापूर तालुक्यात २.५३, अकोटमध्ये ४.५९, पातूरमध्ये १.८६, मूर्तिजापूरमध्ये १.४४ तर अकोला तालुक्यामध्येही पाणी पातळीत मोठी घट होती. या तालुक्यात ०.२२ मीटर पाणी पातळीत घट झाली होती. चालू वर्षी हा अहवाल जानेवारीनंतर तयार होणार आहे.

 

 

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई