शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

पाणी टंचाईच्या झळा वाढल्या !

By admin | Updated: May 5, 2017 14:06 IST

धरणांतील जलसाठय़ाची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे.

शेकडो गावात पाण्यासाठी पायपीट;टॅँकरचा पत्ता नाहीअकोला : एप्रिलअखेरीस जिल्हयातील शेकडो गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांतील जलसाठय़ाची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ४४ अंशापर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ ३0 टक्के जलसाठा शिल्लक आहे.प्रशासनाने आतापासून नवे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.दरम्यान,महानगरपालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या गुडधी गावात स्वांत्र्य मिळाले तेव्हापासून पिण्याच्या पाण्याची सोय नाही,येथील नागरिकांना खारे पाणी सेवन करावे लागत आहे.मागील वर्षी पाऊस बरा झाला तरी त्यामध्ये या भागात सातत्य नव्हते त्यामुळे यावर्षी मध्यम व मोठय़ा धरणांतील जलपातळी घसरली आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने बोअरवेल, हातपंप, विहिरींना पाणीच उपलब्ध नसल्याने महिला-पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या पृष्टभूमीवर टंचाईची तीव्रता वाढल्याने नागरिकांची जिल्हा प्रशासनाकडे टॅँकरची मागणी वाढत आहे.दरम्यान, उन्हाचा कडका ४२ ते ४४ अंशावर गेल्याने बाष्पीभवनाचा वेग दररोज ११ ते १४ मि.मी.ने वाढला आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात एप्रिल महिन्याच्या शेवटी ३२ टक्के जलसाठा उपलब्ध होता, तो आजमितीस ३0 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात २१.५३, निर्गुणा २५.५३, उमा धरणात १४.१६ टक्के तर दगडपारवामध्ये १0.२९ टक्के जलसाठा आहे, तर तीन जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ६0 टक्के जलसाठा होता यासर्व धरणांच्या जलसाठय़ामध्ये पुन्हा घसरण झाली आहे. - गुडधी पाणी टंचाईमहानगर पालिकेत समाविष्ठ झालेल्या गुडधी यागावचे नागरिक सालोसाल खार्‍यापाण्याचे सेवन करत असून, प्रत्येक उन्हाळ्य़ात या पाण्यासाठीदेखील नागरिकांना मैलोगंती पायपीट करावी लागत आहे. यावर्षी येथे भीषण पाणीटंचाई आहे.ग्रामपंचायत असताना येथे पावणे दोन कोटी रू पये खचरून नळ योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली पण पाणी मिळाले नाही. महानगर पालिकेत गाव गेल्यानंतर पाणी मिळले अशी अपेक्षा होता पण ताही अद्याप पुर्ण झालेली नाही. ग्रामपंचायत असताना उन्हाळ्य़ात टॅँकरने पाणी पुरवठा केला जात होता . यावर्षी टॅँकरही नाही. नळयोजनेसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश राऊत यांनी याबाबतीत पुढकार घेत आहेत. -काटेपूर्णा धरणात ३0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. जून, जुलैपर्यंत हा जलसाठा वापरता येईल; परंतु यापुढे या शिल्लक असलेल्या पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.- विजय लोळे, कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग,अकोला.