शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईची फळ पिकांना झळ!

By admin | Updated: May 13, 2014 00:13 IST

फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास दहा हजार हेक्टरवरील फळ पिके धोक्यात

अकोला : जिल्ह्यात काटेपूर्णा धरणात पाणी उपलब्ध असले तरी विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास दहा हजार हेक्टरवरील फळ पिके धोक्यात आली आहेत.
मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे, जलसाठे ओव्हरफ्लो झाली होती. यामुळे यावर्षी शेतकरी निश्चिंत होता; परंतु जमिनीतील पाण्याची हवी तेवढी सरासरी वाढली नव्हती, परिणामी विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. पडलेला पाऊस वेगाने वाहून गेल्यामुळे जमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नाही. या सर्व परिस्थितीची झळ भाजीपाला व फळ बागायतदार शेतकर्‍यांना सोसावी लागत आहे.
जिल्‘ात सर्वाधिक ३,१५० हेक्टरवर संत्रा आहे. दुसर्‍या क्रमांकावर २३०० हेक्टर लिंबू असून, केळी २२५० हेक्टरवर आहे. मोसंबी १५ हेक्टर, पेरू १५२, डाळिंब २५०, चिकू ७५, सीताफळ ७५,आवळा ९० तर आंबा ६२५ हेक्टर आहे. गेल्या दोन वर्षात शेतकर्‍यांनी फळ पिकाचे क्षेत्र वाढविले आहे; परंतु उद्भवणार्‍या पाणीटंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील लिंबाची देशभरात ओळख आहे. परप्रांतात जाणारा येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे. हे क्षेत्र वाढवायचे असेल, तर शेतकर्‍यांना सुविधा, पाण्याची निश्चित हमी हवी आहे.
आताच पाण्याची पातळी घसरली आहे. पुढे पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे फळे उत्पादक शेतकरी आतापासूनच चिंतेत आहे.