शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

जलसंकट गडद : वर्‍हाडातील धरणात ३१ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:40 AM

अकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ांतील धरणात आता केवळ ३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ १२.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये अध्र्यांच्यावर गाळ आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्क्यावर आल्याने वर्‍हाडात जलसंकट गडद झाले. 

ठळक मुद्देकाटेपूर्णात १२ टक्के जलसाठा 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ांतील धरणात आता केवळ ३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ १२.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये अध्र्यांच्यावर गाळ आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्क्यावर आल्याने वर्‍हाडात जलसंकट गडद झाले. वर्‍हाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पांत आजमितीस ३१.४८ टक्के  जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्हय़ातील काटेपूर्णा या मोठय़ा धरणात १२.८४ टक्केच जलसाठा शिल्लक होता. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १४.२१ टक्के, निर्गुणा ५१.९६, उमा धरणात केवळ २.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ८५.४२ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात २४.६0 टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्के आहे. पेनटाक ळी धरणात २१.६३ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ४७.0४, मसमध्ये ११.८४  टक्के, कोराडी ११.६४, पलढग ५९.९२, मन १५.६७ तोरणा १९.९0 टक्के, तर उतावळी धरणात २७.१९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील अडाण धरणात २0.८८ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, तर एकबुर्जी धरणात २१.५५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस धरणात १८.९५ टक्के, अरुणावतीमध्ये १२.४६, तर बेंबळा धरणात १६.५९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्हय़ातील उध्र्व वर्धा या मोठय़ा धरणात ८२.३५ टक्के एवढा बर्‍यापैकी जलसाठा शिल्लक आहे. 

बाष्पीभवनाचा दर ६.२ मिलिमीटर!बाष्पीभवनाचा दर मागील जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ३.६ मिलिमीटर एवढा होता. आता त्यामध्ये ६.२ म्हणजे दुप्पट वाढ झाली. तापमान वाढले तर बाष्पीभवनाचा वेग या भागात १८ मिलिमीटरपर्यंत जातो. त्यामुळे येत्या महिन्यात जलसाठय़ात मोठी घट होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणWaterपाणी