जलसंपदामंत्री उद्या अकाेल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:54+5:302021-02-06T04:31:54+5:30

सायंकाळी ६ वाजता कारंजा येथून मोटारीने मूर्तिजापूर येथे आगमन व मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सायं. पावणेसात वा. अकोटकडे ...

Water Resources Minister tomorrow | जलसंपदामंत्री उद्या अकाेल्यात

जलसंपदामंत्री उद्या अकाेल्यात

सायंकाळी ६ वाजता कारंजा येथून मोटारीने मूर्तिजापूर येथे आगमन व मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सायं. पावणेसात वा. अकोटकडे प्रयाण. रात्री सव्वाआठ वा. अकोट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. रात्री ९ वा. राखीव. रात्री साडेदहा वा. अकोला येथे आगमन व मुक्काम करणार आहेत. रविवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक. सकाळी पावणेदहा वा. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती. सकाळी साडेदहा वा. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, सकाळी सव्वाअकरा वा. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, दुपारी १२ वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा ग्रामीण बैठकीस उपस्थिती. दुपारी दीड वा. बाळापूरकडे प्रयाण. दुपारी सव्वादोन वा. बाळापूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी ३ वा. शेगावकडे प्रयाण करणार आहेत.

०००००

राजेंद्र शिंगणे यांचा जिल्हा दाैरा

अकोला- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे हे शनिवार ६ व रविवार दि.७ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम ते ना. जयंत पाटील यांच्यासमवेत आयोजित बैठकांना उपस्थित राहणार आहेत.

०००००

साखळी याेजना मार्गदर्शन चर्चासत्र

अकाेला वाचन संस्कृतीला अधिक चालना देण्यासाठी ग्रंथालय विभागाच्या वतीने साखळी याेजनेंतर्गत मार्गदर्शन आणि चर्चासत्राचे आयाेजन करण्यात आले आहे. साेमवार, ८ फेब्रुवारी राेजी आयाेजित या चर्चासत्रात अकाेला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे ग्रंथमित्र डाॅ. सत्यनारायण बाहेती हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सनातन धर्मसभा पुस्तकालयाचे अध्यक्ष निकेश गुप्ताि, राेहित केडिया, ॲड. सुरेश अग्रवाल यांनी दिली

०००००

ॲड. कोमल हरणे यांचे यश

(पासपोर्ट फोटो आहे..)

अकोला अमरावती विद्यापीठाच्या जाहीर झालेल्या मेरीट लिस्टनुसार विद्यापीठातून ॲड. काेमल हरणे यांनी प्रथम मेरीट म्हणून घवघवीत यश संपादन केले आहे.

०००००

पहाटगर्भ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

अकाेला माे.ज. मुठाळ यांच्या तिसऱ्या पहाटगर्भ काव्यसंग्रहाचे प्रकाशन मंगळवारी उत्साहात पार पडले. या साेहळ्याला ज्येष्ठ कादंबरीकार तथा समीक्षक डाॅ. सुभाष सावरकर, डाॅ. नीलकंठ मेंढे, प्राचार्य अनिल प्रांजळे, साै. निर्मला सावरकर, डाॅ. याेगिता पिंजरकर, डाॅ. दिनेश राऊत आदी उपस्थित हाेते.

०००००

अंशकालीन पदवीधरांना आर्थिक साहाय्य करा

अकाेला वयाेमर्यादा संपलेल्या अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यांना आर्थिक साहाय्य करण्याची मागणी अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात अशाेक रामटेके, नानक महल्ले, इस्माईल खान यांनी या मागणीची दखल घेण्याची विनंती केली आहे.

०००००

क्रेडाईच्या अध्यक्षपदी दिनेश ढगे

अकाेला - अकाेला क्रेडाईच्या अध्यक्षपदी प्रा. दिनेश ढगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०२१ ते २३ या कालावधीसाठी ही िििनियुक्ती आहे. या नियुक्तीबद्दल ढगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष जितेंद्र पातुरकर, माधव काेठारी, सुरेश कासट, अभय बिजवे, प्रकाश साेमाणी, संताेष माेहता, आनंद बांगड आदी उपस्थित हाेते.

०००००

Web Title: Water Resources Minister tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.