शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

 वऱ्हाडातील जलसाठ्यात झपाट्याने घट;  जलसंकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:33 IST

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक असून, बाष्पीभवनाचा वेग सध्या १८ मि.मी. च्यावर वाढल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे.

ठळक मुद्दे पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणे मिळून केवळ १९.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक असून, बाष्पीभवनाचा वेग सध्या १८ मि.मी. च्यावर वाढल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. परिणाम पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले असून, टॅँकरची मागणी वाढली आहे. नागरिक पाण्यासाठी ठिकठिकाणी मोर्चे काढत आहेत. अकोल्यात आमदारांच्या निवासस्थानासमोर पाण्यासाठी लोटांगण आंदोलन केले.यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणे मिळून केवळ १९.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दीड महिन्यात या जलसाठ्यात २८ टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर ६.६५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे.वऱ्हाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, नोव्हेंबर महिन्यात हा जलसाठा ४९.९७ टक्के होता. आता या सर्व प्रकल्पात आजमितीस १९.९९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. १९ एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात ६.६५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १०.२३ टक्के, निर्गुणा २.३२, उमा धरणात केवळ शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात सध्या ७०.६७ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.०८ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ०.० टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ११.२७ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ३२.९२, मसमध्ये शून्य टक्के, कोराडी ०.८६, पलढग १३.९८, मन ११.२७, तोरणा ७.३५ टक्के, तर उतावळी धरणात ११.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १५.८५ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, तर एकबुर्जी धरणात १.११ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात १४.७१ टक्के, अरुणावतीमध्ये ७.१४, तर बेंबळा धरणात १३.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ४१.५५ टक्के एवढा बऱ्यापैकी जलसाठा शिल्लक आहे.

- वऱ्हाडात नऊ मोठे प्रकल्प१९ एप्रिलपर्यंत वऱ्हाडातील नऊ मोठ्या धरणात १९.९९ टक्के जलसाठा आहे. २३ मध्यम प्रकल्पात २१.९४ टक्के, तर ४५२ लघू प्रकल्पात ११.१५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या सर्व जलसाठ्यातील पाण्याची सरासरी टक्केवारी ही १९.९९ टक्के आहे. यातील लघू प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. त्यामुळे मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणीच वापरले जाणार आहे. त्यामुळे १९ टक्केपेक्षा कमी जलसाठा आजमितीस शिल्लक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीKatepurna Damकाटेपूर्णा धरणnalganga damनळगंगा धरण