म्हातोडी परिसरातील पाण्याची पाईपलाईन फोडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:09+5:302021-05-07T04:19:09+5:30

घुसरवाडी, म्हातोडी, कासली बु, कासली खु., लाटखोडा बु., लाटखेडा खु. या गावांना खांबोरा पाणी पुरवठा नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा ...

Water pipeline in Mhatodi area burst! | म्हातोडी परिसरातील पाण्याची पाईपलाईन फोडली!

म्हातोडी परिसरातील पाण्याची पाईपलाईन फोडली!

घुसरवाडी, म्हातोडी, कासली बु, कासली खु., लाटखोडा बु., लाटखेडा खु. या गावांना खांबोरा पाणी पुरवठा नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु, मागच्या महिन्यात खांबोरा पाणी पुरवठाचे विद्युत बिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडित केला होता व त्यामुळे काही दिवस पाणी पुरवठा बंद होता तसेच वादळी वाऱ्यामुळे काही गावांत पाणी मिळाले नाही. त्यातच ४ मे सोमवारच्या रात्री अज्ञाताने पाण्याची पाईपलाईन फोडली. पाईपलाईन फाेडल्याची माहिती जिल्हा परिषद पुरवठा अधिकारी चव्हाण यांना देण्यात आली. चव्हाण यांनी अज्ञाताविरुद्ध अकोट फाइल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फोटो:

पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तीन वेळा फोडल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. अज्ञाताविरुद्ध तक्रार केली आहे. अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल.

- चव्हाण, पाणी पुरवठा अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Water pipeline in Mhatodi area burst!