शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

पाण्याची पातळी घसरली; अकोला जिल्ह्यातील १५ हजारावर हेक्टरवरील फळबागा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 17:19 IST

अकोला : जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात पाणी आटण्याच्या मार्गावर असून, विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आहेत.

ठळक मुद्देजमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नसल्याने विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आहेत. परप्रांतात जाणारा येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे.

अकोला : जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात पाणी आटण्याच्या मार्गावर असून, विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आहेत. दरम्यान, पाणीटंचाईने नागरिकांची होरपळ सुुरू आहे.मागील वर्षी चांगला पाऊस पूरक न झाल्याने धरणे, धरणात पूरक जजसाठा संचयित झाला नाही. त्यामुळे जमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नसल्याने विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. या सर्व परिस्थितीची झळ यावर्षी भाजीपाला व फळ बागायतदार शेतकºयांना सोसावी लागत आहे.जिल्ह्यात सर्वाधिक साडे तीन हजार हेक्टरवर संत्रा आहे. दुसºया क्रमांकावर २३०० हेक्टरच्यावर लिंबू असून, केळी २२५० हेक्टरवर आहे. मोसंबी १५ हेक्टर, पेरू १५२, डाळिंब २५०, चिकू ७५, सीताफळ ७५,आवळा ९० तर आंबा ६२५ हेक्टर आहे. मागील दोन वर्षात शेतकºयांनी फळ पिकाचे क्षेत्र वाढविले आहे; परंतु उद्भवणाºया पाणीटंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील लिंबाची देशभरात ओळख आहे. परप्रांतात जाणारा येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे. 

भीषण दुष्काळाचा सामनाएकीकडे गावागावांतील शेतकरी भीषण दुष्काळाने हवालदिल झाला आहे. उपलब्ध पाणी ठिबक सिंचनाद्वारे फळबागांना देऊन बागा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. असे असताना अन्न आणि पाण्याच्या शोधात निघालेली रानडुकरे आणि नीलगायी धुमाकूळ घालत फळबागा,भाजीपाल्याचे नुकसान करीत आहे. बाग जगवणे हे सर्वात मोठे आव्हान आमच्या समोर असते. बाग जळाली की, आम्ही काय करावे, संसाराचा गाडा कसा चालवावा हा प्रश्न आम्हाला सतावतो अशा प्रतीक्रीया शेतकºयांमधून उमटत आहेत. 

 पाण्याच्या टाक्यांना कुलपेजिल्हयात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मैलोगंती पायपीट सुरू आहे. जे काही पाणी उपलब्ध होते ते पाणी प्लॅस्टीकच्या टाकीमध्ये साठवून त्याला कुलपे लावली जात आहेत. खारपाण पट्टयातील चित्र विदारक आहे. माणसं पाणी मिळवतात पण मुक्या जनावरांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे. गुरांना पाणी मिळत नसल्याने शेतकºयांनी गुरे विक्रीचा सपाटा लावला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीagricultureशेती