जलवाहिनीला गळती; चार लाखांच्या पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:31+5:302021-05-16T04:18:31+5:30

अकोटः वान धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी टाकलेल्या जलवाहिनीच्या गळतीवरून चार लाखांचे पाणीचोरी केल्याची तक्रार पाणीपुरवठा उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये ...

Water leak; Four lakh water theft | जलवाहिनीला गळती; चार लाखांच्या पाण्याची चोरी

जलवाहिनीला गळती; चार लाखांच्या पाण्याची चोरी

Next

अकोटः वान धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी टाकलेल्या जलवाहिनीच्या गळतीवरून चार लाखांचे पाणीचोरी केल्याची तक्रार पाणीपुरवठा उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये शनिवार, दि. १५ मे रोजी दाखल केली.

पाणीपुरवठा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वान धरण-अकोट शहरादरम्यान, जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीवरील जोडणी शेतमालक सुनील रामकृष्ण राऊत (रा. हिवरखेड) यांनी नादुरुस्त करून जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान केले. जलवाहिनीच्या जोडणीजवळ खड्डा करून पाणी स्वत:च्या विहिरीत घेत आहेत. शेतकरी वारंवार जोडणी निकामी करून भरपूर प्रमाणात शासनाचे पाणी चोरी करीत आहे. आतापर्यंत सदर शेतकऱ्याने चार लाख रुपयांचे पाणी चोरले असून, फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी जलवाहिनीमधून अवैध कनेक्शन घेण्यात आले आहेत. या अवैध कनेक्शनमुळे नियमित पाणी देयक भरणाऱ्या ग्राहकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

Web Title: Water leak; Four lakh water theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.