चौकीदाराची बॅटने हल्ला करून हत्या

By Admin | Updated: May 20, 2017 14:15 IST2017-05-20T14:15:26+5:302017-05-20T14:15:26+5:30

गौरक्षण रोडवरील ओम हाऊसिंग सोसायटी येथील चौकीदार शंकर केशव देशमुख यांची हत्या केली.

The watchman's bat attacked | चौकीदाराची बॅटने हल्ला करून हत्या

चौकीदाराची बॅटने हल्ला करून हत्या

ऑनलाइन लोकमत 

अकोला, दि. 20 -  गौरक्षण रोडवरील ओम हाऊसिंग सोसायटी येथील चौकीदार शंकर केशव देशमुख 61 यांची क्रिकेट खेळणाऱ्या प्रज्योत गजानन गवारे आणि त्याचे वडील गजानन गवारे या दोघांनी बॅटने हल्ला करून हत्या केली. 
चौकीदाराला बॉल लागल्याने  वाद झाला आणि या वादातून हे हत्याकांड घडले, गजानन गवारे हे आकाशवाणी येथे अभियंता असून मुलाने 12 वीची परीक्षा दिली आहे. या दोन्ही आरोपीना दुपारी 1 वाजता अटक करण्यात आली असून त्यांना सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: The watchman's bat attacked