चौकीदाराची बॅटने हल्ला करून हत्या

By Admin | Updated: May 20, 2017 13:52 IST2017-05-20T13:52:12+5:302017-05-20T13:52:12+5:30

किरकोळ कारणावरून दोघांनी येथील एका हाऊसिंग सोसायटीच्या चौकीदाराची क्रिकेट बॅटने वार करून हत्या केल्याची घटना शनिवारी घडली.

The watchman's bat attacked | चौकीदाराची बॅटने हल्ला करून हत्या

चौकीदाराची बॅटने हल्ला करून हत्या

अकोला: किरकोळ कारणावरून दोघांनी येथील एका हाऊसिंग सोसायटीच्या चौकीदाराची क्रिकेट बॅटने वार करून हत्या केल्याची घटना शनिवारी घडली. शंकर केशव देशमुख (६१)असे मृतकाचे नाव असून, ते गोरक्षण रोडवरील ओम हाउसिंग सोसायटीमध्ये चौकीदार म्हणून कार्यरत होते.
क्रिकेट खेळणार्‍या प्रज्योत गजानन गवारे आणि त्याचे वडील गजानन गवारे या दोघांनी क्षुल्लक कारणावरून शंकर देशमुख यांच्यावर बॅटने हल्ला करून त्यांची हत्या केली. चौकीदाराला बॉल लागल्याने वाद झाला आणि या वादातून हे हत्याकांड घडल्याची सकृतदर्शनी समोर आले आहे. गजानन गवारे हे आकाशवाणी येथे अभियंता असून मुलाने १२ वीची परीक्षा दिली आहे. या दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांना सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: The watchman's bat attacked