शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
3
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
4
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
5
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
6
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
7
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
8
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
9
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
10
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
11
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
12
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
13
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
14
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
15
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
16
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
17
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
18
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
19
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
20
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी सिंचनासाठी वान धरणाचे पाणी दोन वेळा मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:34 IST

आमदार प्रकाश  भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्‍यांना रब्बी  सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्‍यांसोबत यशस्वी शिष्टाई करून  चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. 

ठळक मुद्देअखेर सिंचनाचा तिढा सुटलाआ. भारसाकळेंच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा (अकोला): रब्बी हंगामामध्ये दरवर्षी वान धरणाचे पाणी सिंचनासाठी  मिळते; परंतु यावर्षी जिल्ह्यातील अन्य धरणांची पाण्याची स्थिती बिकट आहे. वान  वगळता एकही धरण भरले नाही. संपूर्ण जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी वान  धरणातील पाणी आरक्षित केले होते व केवळ एका कालव्याद्वारे एक पाणी  सिंचनासाठी देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता. त्यामुळे, शेतकरी संतप्त झाले  होते. त्यांनी रब्बीसाठी पाणी मिळावे, ही आग्रही भूमिका घेतली. आमदार प्रकाश  भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्‍यांना रब्बी  सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्‍यांसोबत यशस्वी शिष्टाई करून  चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. तालुक्यातील वान धरण ‘हनुमान सागर’ म्हणून ओळखले जाते. संकटमोचन  असलेले हनुमान सागर शेतकर्‍यांवरील संकट दूर करण्यासाठी दरवर्षी धावून येत  होते. हनुमान सागरमधील पाण्यावर तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील हजारो हे क्टरवर रब्बी पीक घेतल्या जात होते. यावर्षी तालुक्यासह जिल्ह्यात पर्जन्यमान कमी  झाले. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील वान धरण वगळता उर्वरित धरणामध्ये  जलसाठा अल्प प्रमाणात आहे. परिणामी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण  झाला होता. म्हणून जिल्हा प्रशासनाने वान धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले  होते. रब्बी हंगामासाठी केवळ एका कॅनॉलमधून फक्त एक पाणी सोडण्याचा निर्णय  प्रशासनाने घेतला होता. या निर्णयामुळे ज्या कॅनॉलद्वारे सिंचनासाठी पाणी सोडल्या  जाणार होते, त्यालगत असलेल्या शेतमालकांची संभ्रमावस्था होती. कारण केवळ  एका पाण्यावर हरभर्‍याचे पीक येऊ शकत नाही. तसेच ज्यांच्या शेतालगत  असलेल्या कालव्याद्वारे पाणी योणारच नव्हते त्यांची अवस्था मोठी गंभीर झाली हो ती. ज्यांच्या जमिनी या धरणाच्या पाण्यावर सिंचन करण्याकरिता कालवे खोदण्यात  गेली, त्यांच्यावर हा निर्णय अन्यायकारक होता. तेल्हारा तालुक्यातील शेतकर्‍यांवर  अस्मानी संकट आल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आणि  कापूस यापैकी कोणतेच पीक हाती आले नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले  होते. किमान रब्बी पिकासाठी वान धरणातून पाणी मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शे तकरी होते. 

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पTelharaतेल्हाराakotअकोटAkola cityअकोला शहर